'व्हीसीए'चे अध्यक्षपद हे आव्हान: जयस्वाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नागपूर - सध्याच्या परिस्थितीत विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) अध्यक्षपदावर विराजमान होणे हे एक आव्हान आहे आणि हे आव्हान मी स्वीकारले आहे, असे प्रतिपादन "व्हीसीए'चे नवे अध्यक्ष ऍड. आनंद जयस्वाल यांनी केले.

नागपूर - सध्याच्या परिस्थितीत विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) अध्यक्षपदावर विराजमान होणे हे एक आव्हान आहे आणि हे आव्हान मी स्वीकारले आहे, असे प्रतिपादन "व्हीसीए'चे नवे अध्यक्ष ऍड. आनंद जयस्वाल यांनी केले.

विदर्भ क्रिकेट संघटना लोढा समितीच्या शिफारसी स्वीकारणारी पहिली संघटना आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारीणीची निवडणूक आज (रविवार) पार पडली. माजी बीसीसीआय क्रिकेट पंच बी. एस. भट्टी यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदावर विराजमान होताना कुठलाही दबाव नाही. कार्य केंद्रीत केले तर दबाव जाणवेल. मात्र, माझ्याकडून असे होणार नाही. मी कुठलेही कार्य एकटा करणार नाही. कारण क्रिकेटचे प्रशासन करणे ही सांघिक जबाबदारी आहे. बीसीसीआयशी संलग्न असलेल्या सर्वात जुन्या संघटनेपैकी एक असलेल्या संघटनेचा अध्यक्ष होताना परिवारातील सदस्यांची काय प्रतिक्रीया आहे, असे विचारल्यावर काही क्षण थांबून ऍड. जयस्वाल म्हणाले, "यापूर्वी हायकोर्ट बार असोसिएशनचा अध्यक्ष असल्याने अशा जबाबदारीच्या पदावर राहताना असलेल्या कार्याची त्यांना कल्पना आहे. पत्नी व परिवारातील इतर सदस्यांचा नेहमीच पाठींबा राहिला आहे.'

आज झालेल्या व्हीसीएच्या विशेष सर्वसाधारण सभेत आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन झाल्याबद्दल ऍड. शशांक मनोहर यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: VCA chairmanship is a challenge : Jaiswal