शास्त्री किंवा सेहवागबरोबर काम करण्यास तयार: प्रसाद

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

मुख्य प्रशिक्षकपदासाठी मी अर्ज केलेला नाही. भारतीय क्रिकेटसाठी मी सहायक प्रशिक्षक किंवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून योगदान देण्यास तयार आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री किंवा वीरेंद्र सेहवाग यांच्यापैकी कोणाचीही नियुक्ती झाली तरी, मी त्यांच्यासोबत माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव शेअर करू शकतो.

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याच्या वृत्ताचे खंडन करत माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने आपण रवी शास्त्री किंवा वीरेंद्र सेहवागसोबत सहायक प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

एका वृत्तपत्राने व्यंकटेश प्रसाद यानेही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे वृत्त दिले होते. या वृत्ताचे प्रसादने खंडन केले आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागविले होते. या पदासाठी रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अन्य काही जणांनी अर्ज केले आहेत. व्यंकटेश प्रसाद हा सध्या ज्युनियर संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष आहे. त्याचा तीन वर्षांचा करार सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे.

प्रसाद म्हणाला, की मुख्य प्रशिक्षकपदासाठी मी अर्ज केलेला नाही. भारतीय क्रिकेटसाठी मी सहायक प्रशिक्षक किंवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून योगदान देण्यास तयार आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री किंवा वीरेंद्र सेहवाग यांच्यापैकी कोणाचीही नियुक्ती झाली तरी, मी त्यांच्यासोबत माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव शेअर करू शकतो. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखालील समिती सहायक किंवा गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत काय भूमिका घेते माहिती नाही. पण, मला भारतीय संघासोबत काम करताना आनंद वाटेल. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

Web Title: Venkatesh Prasad Wants to Work With Ravi Shastri or Virender Sehwag