झारखंड उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने गुरुवारी विदर्भाचा सहा गडी राखून पराभव करत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा डाव 7 बाद 87 अशा दयनीय स्थितीने रवी जांगीडच्या 62 धावांच्या खेळीमुळे 50 षटकांत 9 बाद 159 पर्यंत पोचला. त्यानंतर झारखंडने 45.1 षटकांत 4 बाद 165 धावा करून विजय मिळविला. धोनीच्या षटकाराने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. ईशांक जग्गीने नाबाद 41 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक - विदर्भ 50 षटकांत 9 बाद 159 (रवी जांगीड 62, रजनीश गुरबानी 22, मोनू कुमार 2-27) पराभूत वि. झारखंड 45.1 षटकांत 4 बाद 165 (प्रत्युष सिंग 33, ईशान किशन 35, ईशांक जग्गी नाबाद 41, धोनी नाबाद 18, रविकुमार ठाकूर 2-25)

Web Title: vijay hajare karandak cricket competition