धोनीकडून कर्णधारपदाचे धडे घेतोय कोहली

पीटीआय
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

बंगळूर - मर्यादित षटकांच्या सामन्यात निर्णय घेताना महेंद्रसिंह धोनीचा अनुभव फायद्याचा ठरतोय, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. कसोटीत नवे नसले, तरी मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी कोहली नवखा कर्णधार असल्याचे टी- 20 मालिकेतून प्रकर्षाने जाणवले. अर्थात, कोहलीनेदेखील ते मान्य केले.

बंगळूर - मर्यादित षटकांच्या सामन्यात निर्णय घेताना महेंद्रसिंह धोनीचा अनुभव फायद्याचा ठरतोय, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. कसोटीत नवे नसले, तरी मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी कोहली नवखा कर्णधार असल्याचे टी- 20 मालिकेतून प्रकर्षाने जाणवले. अर्थात, कोहलीनेदेखील ते मान्य केले.

अखेरच्या टी- 20 सामन्यात भारताने इंग्लंडचा सहज पराभव करून सलग तिसरा मालिका विजय नोंदवला. पण, दडपणाच्या प्रसंगी निर्णय घेताना कोहली अजूनही डगमगताना दिसून आला. अनेकदा धोनीकडून सल्लाही त्याने घेतला. कोहली म्हणाला, ""मर्यादित षटकांच्या सामन्यातही कर्णधारपदाची जबाबदारी माझ्याकडे अगदी अचानक आली. या क्रिकेटमधील दडपण वेगळे असते. त्यामुळे मी प्रदीर्घ नेतृत्व केलेल्या धोनीकडून सल्ला घेतला. संघाच्या कठिणप्रसंगी असा निर्णय घेतला असेल, तर यात मला गैर काहीच वाटत नाही.''

यजुवेंद्रची षटके संपल्यानंतर कोहली पंड्याच्या हातात चेंडू सोपवत होता. पण, धोनी आणि नेहरा यांनी त्याला बुमराला गोलंदाजी देण्याचा सल्ला दिला. कोहलीने तो मान्यदेखील केला आणि तीन चेंडूंत दोन गडी बाद करून सामन्याचे सगळेच चित्र स्पष्ट केले होते. कोहली म्हणाला, 'होय ! मी पंड्याला गोलंदाजी देण्याचा विचार करत होतो. पण, धोनी आणि नेहरा यांनी मला विजयासाठी 19व्या षटकांपर्यंत का वाट पहायची. चेंडू बुमराच्या हाती सोपव, असा सल्ला दिला. बुमराने त्याच षटकांत सामना संपवून टाकला.''

आपल्याला नेतृत्व नवे नाही, असे सांगून कोहली म्हणाला, 'मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार बनण्यासाठी वेगळेच कौशल्य असावे लागते. त्या कौशल्याचा संघाला उपयोग व्हायला हवा. तोच मला धोनीकडून झाला. त्याने मला दडपणाच्या प्रसंगात खूप सांभाळून घेतले.''

कोहली आणखी म्हणाला...
- संघातील युवा खेळाडू विजयासाठी भुकेलेले आहेत. वैयक्तिक कामगिरीपेक्षा त्यांचा सांघिक कामगिरी चांगली होण्याकडे कल वाढला आहे.
- पहिली विकेट झटपट पडल्यानंतरही फलंदाजांनी आक्रमकता सोडली नाही.
- राहुल गुणी फलंदाज. कणखर मानसिकता हे त्याचे वैशिष्ट्य.
- मिश्राने सुरवात केली, युजवेंद्रने घाव घातला
- सलामीला येऊन धावा झाल्या असता, तर माझ्या सलामीच्या येण्याविषयी चर्चा झाली नसती. चर्चा सोडा, विजयाचा आनंद घ्या.
- मर्यादित षटकांच्या सामन्यात नेतृत्व करताना मानसिक कणखरता असायला हवी.

Web Title: virat kohali learned by mahendrasinh dhoni