'आयपीएल' खेळण्यासाठी विराट कोहली तंदुरुस्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नवी दिल्ली - खांद्याच्या दुखापतीतून बरा झालेला विराट कोहली आता "आयपीएल' खेळण्यास तंदुरुस्त असल्याचे गुरुवारी "बीसीसीआय'नेच जाहीर केले. यामुळे कोहली उद्या (ता. 14) मुंबईविरुद्धची लढत खेळण्यास उपलब्ध असेल. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या खांद्यास दुखापत झाली होती. त्यानंतर पुरेशी विश्रांती आणि उपचार घेतल्यानंतर कोहली आता खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे "बीसीसीआय'ने स्पष्ट केले. दुखापतीमुळे कोहली "आयपीएल'च्या तीन सामन्यांना मुकला होता. यातील दोन सामने बंगळूर संघाने गमावले. 

बंगळूर संघ सध्या दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. कोहलीने गेल्यावर्षी "आयपीएल'मध्ये सोळा सामन्यांत चार शतके आणि सात अर्धशतकांसह 973 धावा केल्या होत्या.

Web Title: virat kohali ready for ipl