'आयसीसी' कसोटी क्रमवारीत विराट कोहली चौथ्या स्थानावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे "आयसीसी' कसोटी क्रमवारीतील स्थान एकने घसरले असून, तो आता चौथ्या स्थानावर आला आहे. गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचच आर. अश्‍विन आपले अव्वल स्थान टिकवून आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत शानदार शतकी खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा ज्यो रुट असून, ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने अव्वल स्थान कायम राखले आहे. दरम्यान, गोलंदाजी क्रमवारीतील अव्वल स्थान अश्‍विन आणि जडेजा यांनी कायम राखले आहे. अश्‍विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे.

Web Title: virat kohli 4th no. in icc test sorting