World Cup 2019 : कोहलीचे 'विराट' विक्रम; सचिन, लाराला टाकले मागे

वृत्तसंस्था
Thursday, 27 June 2019

- कोहलीचे एका मागोमाग 'विराट' विक्रम
- सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराचे तोडले विक्रम

वर्ल्ड कप 2019 :
मॅंचेस्टर :
वेस्ट इंडिज विरोधात 37 धावांची खेळी करत विराटनं 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असं करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर (463 सामन्यात 18 हजार 426) आणि सौरव गांगुली (308 सामन्यात 11 हजार 353 धावा) यांनी हा टप्पा पार केला आहे. याआधी विराटने 10 हजार धावांचा टप्पा देखील सर्वात वेगाने गाठला होता. 

तसेच, विराट कोहलीने आईसीसी क्रिकेट वर्ल्‍ड कप 2019 मध्ये वेस्‍ट इंडीज विरोधात 37वी धाव करताना 20 हजार अंतरराष्‍ट्रीय धावा बनवन्याचा विक्रम केला. यासोबत विराटने सर्वात कमी सामन्यात 20 हजार अंतरराष्‍ट्रीय रन बन करण्याचा विक्रम केला आहे. विराटने हा विक्रम केवळ 417 डावांमध्ये केला आहे. कोहलीने आतापर्यंत 131 टेस्ट आणि 224 एकदिवसीय तर 62 टी-20 खेळले आहेत.

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराने प्रत्येकी 453 डावांच्या मदतीने 20000 धावांचा टप्पा पार पाडला होता. तर, रिकी पॉन्टिंगने हा टप्पा 468 डावांच्या मदतीने पूर्ण केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli becomes fastest batsmen to make 20,000 International runs