सहा द्विशतके करणारा विराट झाला पहिला कर्णधार

वृत्तसंस्था
Sunday, 3 December 2017

सर्वाधिक द्विशतके झळकाविणारे जगातील फलंदाज -
डॉन ब्रॅडमन - 12 द्विशतके
कुमार संगकारा - 11 द्विशतके
ब्रायन लारा - 9 द्विशतके
वॅली हॅमॉंड - 7 द्विशतके
माहेला जयवर्धने - 7 द्विशतके
विराट कोहली - 6 द्विशतके

नवी दिल्ली - विक्रमामागून विक्रम रचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने आज (रविवार) आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सहावे द्विशतक झळकावून त्याने सर्वाधिक द्विशतके करणारा कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली. 

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 238 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 20 चौकारांचा समावेश होता. विराटने शनिवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी कारकिर्दीत 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. आता त्याने द्विशतक झळकावून कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक पूर्ण केले. 

भारताकडून सर्वाधिक द्विशतके करण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग (6 द्विशतके) यांच्या नावावर होता. आज विराटने यांची बरोबरी केली आहे. त्याने राहुल द्रविडला (5 द्विशतके) मागे टाकले. याबरोबरच एकपाठोपाठ एक द्विशतके करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळीने 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध 224 आणि झिंबाब्वेविरुद्ध 227 धावा केल्या होत्या. 

सर्वाधिक द्विशतके झळकाविणारे जगातील फलंदाज -
डॉन ब्रॅडमन - 12 द्विशतके
कुमार संगकारा - 11 द्विशतके
ब्रायन लारा - 9 द्विशतके
वॅली हॅमॉंड - 7 द्विशतके
माहेला जयवर्धने - 7 द्विशतके
विराट कोहली - 6 द्विशतके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Becomes First Captain To Score Six Double Centuries In Test Cricket