विराटने पुन्हा मोडला सचिनचा विक्रम; मिळालं 'सरप्राईज'!

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

साउदम्पटन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला हॉटेल स्टाफकडून अनोखे सरप्राईज देण्यात आले.

शुक्रवारी दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये परतल्यानंतर विराटला एक सरप्राईज मिळाले. ते पाहून विराटही भारावला. हॉटेल स्टाफने विराटला सहा हजार लिहिलेला एक भलामोठा केक कापण्यास दिला. विराटनेही ट्विटरवरून याबद्दल हॉटेल स्टाफचे आभार मानले.

विराटने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात सचिनचा एक विक्रम मोडला. विराट कोहली प्रत्येक सामन्यानंतर नवनवे विक्रम आपल्या नावे करत आहे. कसोटी कारकिर्दीतील सहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला फक्त सहा धावा आवश्यक होत्या. त्याने 119 व्या डावांत सहा हजार धावा करण्याचा विक्रम केला. यापूर्वी सचिनच्या नावावर 120 डावांत सहा हजार धावा करण्याचा विक्रम होता.

विराटने सचिनला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटीत वेगवान सहा हजार धावा करण्याचा विक्रम भारताच्याच लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 117 डावांत हा विक्रम केला होता. 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराट सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत दोन शतके झळकाविली आहेत. त्याच्या या कसोटीतही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. कोहलीने या खेळीपूर्वी 69 कसोटी सामन्यातील 118 डावांत फलंदाजी करताना 23 शतकांसह 5994 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी 55 आहे. कसोटीमध्ये विराट कोहलीची 248 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli breaks another record of Sachin Tendulkar