देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर विराट कोहलीचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
Friday, 9 November 2018

क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन सोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.

नवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन सोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.
 

कोहलीने म्हटले आहे की, हे ट्रोलिंग माझ्यासाठी नाही तसेच याकडे लक्ष द्यावे असे मला वाटत नाही. माझा सल्ला केवळ त्या लोकांसाठी होता ज्यांनी भारतीय फलंदाजीवर नकारात्मक टीका केली आहे. मला देखील बोलण्याचा आणि आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या बोलण्याला जास्त गांभीर्याने घेऊ नका दिवाळीचा आनंद घ्या, माझ्याकडून सर्वांना प्रेम आणि शांततेच्या शुभेच्छा. अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

 

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला जे पाठिंबा देत नाहीत त्यांनी देशच सोडायला हवा, असे मत विराट कोहलीने व्यक्त केल्यामुळे वाद सुरू झाला होता. एका क्रिकेट चाहत्याने आपल्याला भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आवडतात, असे सांगितले होते. त्यावर, विराटने ही टिप्पणी केली होती. यानंतर विराटला सोशल मिडीयावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. म्हणून विराटने यावर पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Broke Silence The Quick Answer Given To The Trollers