esakal | चौकार खेचून कोहलीने पूर्ण केल्या 5000 धावा
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

विराट कोहलीने चौकार मारून पाच हजार धावा पूर्ण केल्या. त्याला पाच हजार धावा पूर्ण करण्यासाठी 25 धावांची गरज होती. पाच हजार धावा पूर्ण करणारा कोहली 11 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीने 63 व्या कसोटीत ही कामगिरी केली.

चौकार खेचून कोहलीने पूर्ण केल्या 5000 धावा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीत 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

विराट कोहलीने चौकार मारून पाच हजार धावा पूर्ण केल्या. त्याला पाच हजार धावा पूर्ण करण्यासाठी 25 धावांची गरज होती. पाच हजार धावा पूर्ण करणारा कोहली 11 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीने 63 व्या कसोटीत ही कामगिरी केली.

वेगवान पाच हजार धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. सुनील गावसकर यांनी 53 आणि वीरेंद्र सेहवागने 59 कसोटीत पाच हजार धावा केल्या होत्या. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 67 कसोटी सामने खेळावे लागले होते. मात्र, डावांचा विचार केल्यास सचिन विराटच्या पुढे आहे.

विराटने पाच हजार धावांचा टप्पा 52 च्या सरासरीने पूर्ण केला आहे. त्याने आतापर्यंत 19 शतके आणि 14 अर्धशतके झळकाविली आहेत. विराटपूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, जी. आर. विश्वनाथ आणि कपिल देव यांनी पाच हजार धावा केल्या आहेत.

loading image