अनुष्कामुळे प्रेरणा, अजून 9 वर्षे खेळणार: विराट कोहली

वृत्तसंस्था
Saturday, 17 February 2018

अनुष्काच्या प्रेरणेमुळेच मी चांगली कामगिरी करू शकलो. दक्षिण आफ्रिका दौरा अनेक चढ-उतारांचा होता. लोकांनी यासाठी मैदानात तसेच मैदानाबाहेर साथ दिली. माझ्या जवळच्या लोकांना या विजयाचं श्रेय जाते. माझी पत्नी या संपूर्ण दौऱ्यादरम्यान माझा उत्साह वाढवत होती. अनुष्का माझ्याबरोबर खंबीरपणे उभे होती. माझ्यावर टीका होत असतानाच्या कठीण प्रसंगी अनुष्का माझा उत्साह वाढवत होती.

सेंच्युरियन : भूतकाळात अनुष्काबद्दल बरेच काही बोलले गेले. पण, ती अशी व्यक्ती आहे, की प्रत्येक दौऱ्यात चांगल्या कामगिरीसाठी मला प्रेरणा देत असते. मी अजून 8 ते 9 वर्षे खेळेल आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

भारताने दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेवर ५-१ असा विजय मिळविला. विराट कोहलीने या मालिकेत 3 शतके झळकाविले. त्याची आतापर्यंत एकदिवसीय कारकिर्दीत 35 शतके झाली आहेत. 

या विजयानंतर विराट कोहली म्हणाला, की अनुष्काच्या प्रेरणेमुळेच मी चांगली कामगिरी करू शकलो. दक्षिण आफ्रिका दौरा अनेक चढ-उतारांचा होता. लोकांनी यासाठी मैदानात तसेच मैदानाबाहेर साथ दिली. माझ्या जवळच्या लोकांना या विजयाचं श्रेय जाते. माझी पत्नी या संपूर्ण दौऱ्यादरम्यान माझा उत्साह वाढवत होती. अनुष्का माझ्याबरोबर खंबीरपणे उभे होती. माझ्यावर टीका होत असतानाच्या कठीण प्रसंगी अनुष्का माझा उत्साह वाढवत होती. फलंदाजी चांगली करण्यासाठी तुम्ही एका चांगल्या झोनमध्ये असणं गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या आजूबाजूला चांगली लोक असणे आवश्यक आहे. 

मागील सामन्यामध्ये माझा माइंडसेट ठीक नव्हता. आज मैदानात पूर्णवेळ मला छान वाटते आहे. त्यामुळे आज मी समोरून येणाऱ्या बॉलवर योग्यपण लक्ष केंद्रीत केले. जेव्हा तुच्या बॅटमधून धावा निघतात, तुम्ही टीमला विजय मिळवून देऊन नाबाद परत जाता तेव्हा खूप मस्त वाटते. माझ्या क्रिकेट करिअरची अजून 8-9 वर्ष आहेत. त्यामुळे मला त्याचा पूरेपूर वापर करायचा आहे. माझ्याने जितकी होईल तितकी मेहनत करनी हे. दैवीकृपेने मी तंदुरुस्त आहे. देशासाठी कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली. ही अभिमानाची गोष्ट आहे, असे विराटने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli credits Anushka Sharma for success in South Africa