बेंगळूरुच्या विजयानंतरही भारतीय क्रिकेटपटूंचा ट्रेक 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

रवीचंद्रन अाश्वीन, अभिनव मुकुंद, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, करुण नायरचा त्यात सहभाग होता. अश्वीनने जंगलातील ट्रेकचे छायाचित्र ट्विट केले आहे. 

मुंबई - पुणे कसोटीतील पराभव विसरण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने ताम्हीणी घाटात ट्रेकिंग केले होते. आता बेंगळूरु कसोटी विजयानंतरही भारतीय संघातील काही खेळाडूंनी ट्रेकिंग केले आहे. 

पुणे पराभवानंतर अनिल कुंबळे यांनी खेळाडूंना फ्रेश करण्यासाठी ट्रेकिंगचा कार्यक्रम आखला होता. त्या वेळी खेळाडूंना घरी जाण्याऐवजी यात सहभागी होण्यास सांगितले होते; तर आता बेंगळूरु विजयानंतर भारतीय संघातील काही खेळाडूंनी हे ट्रेकिंग स्वतःहून केले. रवीचंद्रन अाश्वीन, अभिनव मुकुंद, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, करुण नायरचा त्यात सहभाग होता. अश्वीनने जंगलातील ट्रेकचे छायाचित्र ट्विट केले आहे. 

लढाईच्या मैदानापासून स्वतःला दूर नेणे हेही प्रसंगी तिथे असण्यासारखेच असते, अशी ओळ अश्वीनने जंगलातील ट्रेकच्या या छायाचित्रास दिली आहे; मात्र कोणत्या जंगलात आणि कधी हे ट्रेकिंग केले हे सांगणे अाश्वीनने टाळले आहे. 
 

Web Title: Virat Kohli 'Detoxes' at Home; R Ashwin Goes on a Trek Post Bengaluru Win