सचिनला जे जमले नाही, ते विराटने केले- गांगुली

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

पुण्यातील कसोटीत तो दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याने चुकीच्या फटक्याची निवड केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशात त्याने सलग शतके झळकाविलेली आहेत.

नवी दिल्ली - विराट कोहलीने सलग चार मालिकांमध्ये द्विशतके आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशात सलग शतके झळकाविली आहेत. सचिन तेंडुलकरला जमले नाही, ते विराट कोहलीने करून दाखविले आहे, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटला अवघ्या 0 आणि 13 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीका होत असताना गांगुलीने त्याची पाठराखण केली आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी गांगुलीने कोहलीला पाठिंबा देत त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

गांगुली म्हणाला, की पुण्यातील कसोटीत तो दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याने चुकीच्या फटक्याची निवड केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशात त्याने सलग शतके झळकाविलेली आहेत. सचिन तेंडुलकरलाही अशी कामगिरी जमलेली नाही. विराटच्या एका कामगिरीकडे बघू नका, त्याने सलग चार मालिकांमध्ये द्विशतके झळकाविली आहेत.

Web Title: Virat Kohli Did What Sachin Tendulkar Couldn't, Says Sourav Ganguly