अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट पत्नी अनुष्कासोबत भटकंतीला गेला होता. भटकंतीवरून परत आल्यानंतर त्याला वर्षाअखेरिस एक गुड न्यूज मिळाली आहे. त्यानं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट पत्नी अनुष्कासोबत भटकंतीला गेला होता. भटकंतीवरून परत आल्यानंतर त्याला वर्षाअखेरिस एक गुड न्यूज मिळाली आहे. त्यानं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे विराटनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील द्विशतकी खेळीनंतर बांगलादेशविरुद्धही शतक झळकावलं. या मालिकांपूर्वी दोन्ही फलंदाजांच्या गुणांमध्ये अवघ्या तीन गुणांचा फरक होता. पाकिस्तानविरुद्धच्या अपयशामुळे स्मिथची क्रमवारीत घसरण झाली आणि तो थेट 931 गुणांवरून 923 गुणांवर पोहोचला, तर कोहलीच्या खात्यात 928 गुण कायम राहिले. त्यामुळे वर्षअखेरीस कोहलीनं कसोटी फलंदाजांत अव्वल स्थान पटकावलं आहे. 

पुणे : शिवाजीनगरऐवजी आता 'या' ठिकाणावरून सुटणार एसटी

दरम्यान, विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.  क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतल्यानंतर विराट पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. 

बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय

तसेच, फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहात भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचाही समावेश आहे. पुजारा 791 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे, तर अजिंक्यला एका स्थानाचा तोटा सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी खेळी करून पाचव्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे अजिंक्यची ( 759) सहाव्या स्थानी घसरण झाली. गोलंदाजांत जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानी कायम आहे. टॉप टेनमध्ये बुमराहसह भारताचा आर. अश्विन (9) आणि मोहम्मद शमी (10) यांचा समावेश आहे. तर, अष्टपैलू खेळाडूंमध्ये जेसन होल्डर ( 473) अव्वल स्थानी कायम आहे, तर रवींद्र जडेजा (406) आणि आर अश्विन (308) यांनी अनुक्रमे दुसरे व पाचवे स्थान कायम राखले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli finishes 2019 as No. 1 batsman In Test Cricket