..तर, आणखी धावा केल्या असत्या- विराट कोहली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

कटक : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकली आहे, मात्र कर्णधार विराट कोहलीने सलामीच्या फलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या. त्यांनी चांगली सुरवात केली असती तर आणखी जास्त धावा करता आल्या असत्या, असे त्याने सांगत त्याने आपली महत्त्वाकांक्षी स्पष्ट केली. दरम्यान, त्याने युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीचे कौतुक केले.

कोहली म्हणाला, "आमच्या क्षमतेपैकी केवळ 75 टक्के आम्ही कामगिरी करू शकलो. पहिल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असती तर अधिक चांगली कामगिरी झाली असती." 

"सलामीच्या फलंदाजांच्या जोडीने चांगली सुरवात केली असती तर आमची एकूण धावसंख्या कितीवर गेली असती, याचा विचार मी करत आहे. मात्र ते फलंदाज अपयशी ठरले तर धोनी आणि युवराज या दोघांनी संघाची कामगिरी उंचावली आणि विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 
 
Web Title: virat kohli hopes to score more