विराटला पहिल्यांदाच जावे लागले पराभवाला सामोरे

वृत्तसंस्था
Wednesday, 18 July 2018

लिड्स : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे विराट कोहलीची कर्णधार म्हणून सुरु असलेली मालिका विजयाची घौडदोड खंडीत झाली आहे. 

भारताच्या कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून विराट कोहलीने ती अत्यंत उत्तमरित्या हाताळली आहेत. 2013पासून विराट कोहलीने आठ एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व केले आहे आणि या आठही एकदिवसीय मालिकेत भारताला एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. मात्र मंगळवारी (17 जुलै) इंग्लंडविरुद्ध झालेल्या निर्णायक सामन्यातील पराभवामुळे विराट कोहलीची कर्णधार म्हणून सुरु असलेली आठ एकदिवसीय मालिका जिंकण्याची घौडदोड खंडित झाली आहे. 

विराट कोहलीने 2013 पासून झिंबाब्वे, श्रीलंका(दोनदा), दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्या विरोधात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यातील दोन मालिका महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडण्यापूर्वी तर सहा मालिका धोनीने 2017मध्ये कर्णधारपद सोडल्यानंतर झाल्या होत्या. भारतीय संघाने कोहलीच्या नेतृत्वाखाली 52 एकदिवसीय सामन्यांपैकी 39 सामन्यात विजय संपादन केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virat kohli loses first odi series