आयपीएलच्या काही सामन्यांना विराट कोहली मुकणार

पीटीआय
बुधवार, 29 मार्च 2017

धरमशाला - क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळू शकला नाही, या दुखापतीतून तो अजूनही पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे आयपीएलच्या सुरवातीच्या काही सामन्यांना तो मुकण्याची शक्‍यता आहे, तसे संकेतही त्याने दिले. मैदानावर पूर्णपणे तंदुरुस्तीसह येण्यासाठी अजून काही आठवडे लागतील, असे विराटने मालिका विजयाचा करंडक अजिंक्‍य रहाणेसह स्वीकारल्यानंतर सांगितले. आयपीएल ५ एप्रिलपासून सुरू होत असून, सलामीलाच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स संघाचा सामना  गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. 

Web Title: Virat Kohli miss some IPL matches