'...म्हणून विश्वकरंडकात विराटला धोनीची गरज'

वृत्तसंस्था
Sunday, 30 September 2018

महेंद्रसिंह धोनी हा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याच्यावर विश्वास टाकता येवू शकतो. कर्णधार विराट कोहलीला विश्वकरंडकातील दबाव सहन करण्यासाठी धोनीसारखा खेळाडू आजूबाजूला हवा आहे, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी हा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याच्यावर विश्वास टाकता येवू शकतो. कर्णधार विराट कोहलीला विश्वकरंडकातील दबाव सहन करण्यासाठी धोनीसारखा खेळाडू आजूबाजूला हवा आहे, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले.

आशिया करंडकात धोनीच्या संथ फलंदाजीवरून त्याच्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अनेक माजी खेळाडूंना नव्या यष्टीरक्षकाला संधी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र, धोनीच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्याबाबत अद्याप त्याच्या तोडीला कोण यष्टीरक्षक असल्याचे दिसत नाही. त्यामुळे धोनीचा हाच अनुभव भारताला आगामी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकात उपयोगी येईल, असे सगळ्यांना वाटते. मांजरेकर यांनीही याबाबतीत धोनीचे कौतुक केले आहे.

मांजरेकर म्हणाले, की धोनी हा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. विश्वकरंडकात कोहलीला योग्य ते सल्ले देण्यासाठी धोनी संघात हवा आहे. त्याच्यामुळे संघातही चांगले बदल करता येतील. धोनीला फलंदाजीचाही चांगला अनुभव आहे. धोनीला आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत आपली फलंदाजी दाखवून टीकाकारांचे तोंड बंद करण्याची संधी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virat kohli needs MS Dhoni in World Cup says Manjrekar