विराटने धोनीबरोबर एकांतात बोलावे: गांगुली

वृत्तसंस्था
Monday, 13 November 2017

धोनीची एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत ट्वेंटी-20 कामगिरी चांगली नाही. कोहली आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्याशी एकांतात बोलले पाहिजे. त्याच्यात खूप प्रतिभा आहे.

मुंबई - ट्वेंटी-20 क्रिकेटमधील संथ फलंदाजीनंतर महेंद्रसिंह धोनीवर चोहोबाजूने टीका होत असताना आता माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीने आता धोनीसोबत एकांतात बोलून त्याच्या भविष्याविषयी बोलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

धोनीने संथ फलंदाजी केल्याने माजी क्रिकेटपटू अजित आगरकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि आकाश चोप्रा यांनी धोनीला सल्ला देताना म्हटले होते, की त्याने आता युवा खेळाडूंना संधी निर्माण करून द्यावी. गांगुलीने मात्र याबाबत आपले वेगळे मत व्यक्त करत धोनीला दिलासा दिला आहे.

गांगुली म्हणाला, की धोनीची एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत ट्वेंटी-20 कामगिरी चांगली नाही. कोहली आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्याशी एकांतात बोलले पाहिजे. त्याच्यात खूप प्रतिभा आहे. ट्वेंटी-20मध्ये तो वेगळी भूमिका बजावू शकला तर यशस्वी होईल. धोनी अद्याप क्रिकेट खेळू शकतो, विशेषतः एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो अजूनही खेळू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Needs To Speak To MS Dhoni Separately: Sourav Ganguly