इंग्लंड दौऱ्यासाठी विराट कौंटी क्रिकेट खेळणार

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौंटी क्रिकेटमध्ये पहिल्या टप्प्यात तो खेळणार असल्याचे निश्चित आहे. त्यापेक्षा मी अधिक काही सांगू शकत नाही. सरे किंवा एसेक्स या संघाकडून तो खेळू शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही. आयपीएल संपल्यानंतर तो कौंटीत खेळण्यासाठी रवाना होईल.

नवी दिल्ली - आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबर या काळात इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने आतापासूनच तयारीस सुरवात केली आहे. विराटने सरे या कौंटी क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी विराट कौंटीत खेळणार आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एकही सराव सामन्यात न खेळता आल्याने कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता भारतीय संघाने ही चूक सुधारत परदेश दौऱ्याची तयारी आतापासूनच सुरु केली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौंटी क्रिकेटमध्ये पहिल्या टप्प्यात तो खेळणार असल्याचे निश्चित आहे. त्यापेक्षा मी अधिक काही सांगू शकत नाही. सरे किंवा एसेक्स या संघाकडून तो खेळू शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही. आयपीएल संपल्यानंतर तो कौंटीत खेळण्यासाठी रवाना होईल.

Web Title: Virat Kohli to play County cricket for England preparation