esakal | कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोहलीचे अव्वल स्थान कायम
sakal

बोलून बातमी शोधा

कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोहलीचे अव्वल स्थान कायम

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे कसोटी क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या 2-1 कसोटी मालिकेतील विजयानंतर कोहली 922 गुणांसह आघाडीवर होता.

कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोहलीचे अव्वल स्थान कायम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई ः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे कसोटी क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या 2-1 कसोटी मालिकेतील विजयानंतर कोहली 922 गुणांसह आघाडीवर होता. 

त्यानंतर कसोटी मालिकाच न झाल्यामुळे कोहलीचे गुण आणि अव्वल स्थान कायम राहिले आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन 913 गुणांसह दुसऱ्या, तर चेतेश्‍वर पुजारा 881 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

कसोटी क्रिकेटच्या सांघिक क्रमवारीतही भारताचे अव्वल स्थान कायम राहिले आहे. भारतानंतर न्यूझीलंडचा क्रमांक दुसरा, तर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक तिसरा आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. 

गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्‍विन हे दोघेच पहिल्या दहांत असून, ते अनुक्रमे सहाव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. पोटऱ्याच्या दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यातून माघार घेणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या स्थानावर आहे. आघाडीवर असणारा ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि त्याच्यात 16 गुणांचा फरक आहे. 

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर आघाडीवर असून, बांगलादेशाचा शकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा रवींद्र जडेजाचे स्थान तिसरे आहे.

loading image