...तर कोहलीने स्वतःला संघातून वगळावे: सेहवाग

वृत्तसंस्था
Sunday, 14 January 2018

एका कसोटीत अपयशी ठऱल्याने शिखर धवनला संघातून वगळण्यात आले. भुवनेश्वरला वगळण्याचे काही कारणही देण्यात आले नाही. विराट जर दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला तर, तो स्वतः तिसऱ्या कसोटीसाठी संघात असणार नाही का?

नवी दिल्ली - भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील भारतीय संघ निवडीवरून कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केले आहे. दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरल्यास विराट कोहलीने स्वतःला संघातून वगळावे, असे सेहवागने म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मुसंडी मारण्याची शक्‍यता केवळ 30 टक्केच आहे. दुसऱ्या कसोटीसाठी संघ निवडताना संघ व्यवस्थापनाने तेथील हवामान आणि खेळपट्टीचे एकूण स्वरूप ओळखूनच योग्य संघनिवड करावी, असे सेहवाग यापूर्वीच म्हटले होते. दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात शिखर धवनला वगळून के. एल. राहुलला, भुवनेश्वर कुमारऐवजी ईशांत शर्माला स्थान देण्यात आले. तर, जखमी साहाऐवजी पार्थिवला संधी देण्यात आली. अजिंक्य रहाणे दुसऱ्या कसोटीतही संघाबाहेरच आहे. यावरून वाद निर्माण झाला असून, अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघ निवडीवर टीका केली आहे.

सेहवाग म्हणाला, की एका कसोटीत अपयशी ठऱल्याने शिखर धवनला संघातून वगळण्यात आले. भुवनेश्वरला वगळण्याचे काही कारणही देण्यात आले नाही. विराट जर दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला तर, तो स्वतः तिसऱ्या कसोटीसाठी संघात असणार नाही का? अशा निर्णयामुळे भुवनेश्वरच्या आत्मविश्वाला तडा गेला असेल. भुवनेश्वरला वगळून योग्य केले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli should drop himself if he fails in Centurion Test says Virender Sehwag