कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक विक्रमाजवळ

टीम ई सकाळ
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी जिंकत भारतीय संघाने सलग सहा कसोटी मालिकांमध्ये विजय आणि इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिका जिंकली आहे.

आक्रमक वृत्ती, फलंदाजीतील सातत्य आणि खेळाडूंना सतत प्रोत्साहन देणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने सलग आठ मालिकांमध्ये विजय मिळवीत जागतिक विक्रमाजवळ भारताला नेले आहे. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांना एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सलग नऊ मालिकांमध्ये विजय मिळविता आला आहे. आतापर्यंत एकही भारतीय कर्णधार करू न शकलेली कामगिरी विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने करून दाखविली आहे. 

बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी जिंकत भारतीय संघाने सलग सहा कसोटी मालिकांमध्ये विजय आणि इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिका जिंकली आहे. या सर्व मालिकांमध्ये कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. विराटने सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावत सर डॉन ब्रॅडमन, राहुल द्रविड या मातब्बर खेळाडूंना मागे टाकले होते. 

कोहलीच्या नेतृत्वाखालील कामगिरी -

 • विराट कर्णधार असताना 23 कसोटीत 15 विजय, 2 पराभव आणि 6 अनिर्णित 
 • कर्णधार असताना कोहलीच्या 23 कसोटीत 37 डावांत 2353 धावा, 67.22 सरासरी, 9 शतके, 4 अर्धशतके, 235 सर्वोच्च धावा
 • कर्णधार नसताना कोहलीच्या 31 कसोटीत 55 डावांत 2098 धावा, 41.31 सरासरी, 7 शतके, 10 अर्धशतके, 169 सर्वोच्च धावा
 • सलग सहा कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार
 • श्रीलंकेविरुद्ध 2-1 (2015), दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3-0 (2015-16), वेस्ट इंडीजविरुद्ध 2-0 (2016), न्यूझीलंडविरुद्ध 3-0 (2016), इंग्लंडविरुद्ध 4-0 (2016)
 • इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2-1 आणि ट्वेंटी-20 मालिकेत 2-1 असे विजय
 • यापूर्वी अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी आणि वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली सलग पाच मालिकांमध्ये भारतीय संघाचा विजय
 • इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटी जिंकण्याचा कोहलीच्या नेतृत्वाखाली विक्रम
 • यापूर्वी महंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 1992-93 मध्ये कोलकता, चेन्नई आणि मुंबईत विजय
 • 2016 मध्ये खेळलेल्या 11 कसोटीत 8 सामन्यांत भारताचा विजय, त्यापूर्वा 2010 मध्ये 14 कसोटीतील 8 मध्ये विजय
 • कसोटी कर्णधार असताना पहिल्या डावात सलग तीन शतके झळकाविण्याची कामगिरी
 • परदेशात द्विशतक झळकाविणारा पहिला कर्णधार
Web Title: virat kohli sucess as captain Team India India versus Bangladesh