esakal | आणखी एक शतक; कोहली सचिनपेक्षा फक्त 09 शतकांनी मागे!
sakal

बोलून बातमी शोधा

आणखी एक शतक; कोहली सचिनपेक्षा फक्त 09 शतकांनी मागे!

सलामीवीर लवकर बाद झाले.. मधली फळीही धावा जोडेना.. तेव्हा केवळ तोच भारतीय संघाचा डाव सावरतो. विराट कोहली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 40वे शतक झळकाविले. 

आणखी एक शतक; कोहली सचिनपेक्षा फक्त 09 शतकांनी मागे!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नागपूर : सलामीवीर लवकर बाद झाले.. मधली फळीही धावा जोडेना.. तेव्हा केवळ तोच भारतीय संघाचा डाव सावरतो. विराट कोहली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 40वे शतक झळकाविले. 

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन लवकर बाद झाल्यावर पुन्हा एकदा भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी कोहलीवर येऊन पडली आणि त्याने ती नेहमीप्रमाणे लिलया पेलली. समोरुन अंबाती रायुडू, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी बाद होत असताना त्याने संयमी खेळी करत 43व्या शतकात आपले शतक साजरे केले. 

भारतीय संघ अडचणीत सापडला असताना कोहलीने विजयला साथीत घेत भारताच्या डावाला आकार दिला. विजय बाद झाल्यानंतर त्याने जडेजासह फलंदाजी करताना आपले शतक साजरे केले.