विराट कोहली माझ्यापेक्षा दुप्पट आक्रमक - गांगुली

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

कोलकाता - विराट कोहली हा कर्णधार म्हणून माझ्यापेक्षा दुप्पट आक्रमक आहे, असे मत टीम इंडियामध्ये जशास तसे उत्तर देण्याची जिद्द जागवणाऱ्या माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले.

"सौरभ गांगुली फाउंडेशन'च्या वतीने क्रिकेट स्कूलचे अनावरण करताना गांगुली विराट कोहलीच्या आक्रमकतेचे कौतुक करत होता. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस्‌वर जेथे सर्व काही शिस्तीत घडते, तेथील ड्रेसिंग रूमच्या गॅलरीत भारताच्या विजयानंतर टी शर्ट काढून विजयोत्सव साजरा करण्याची धमक गांगुलीने 2002 मध्ये दाखवली होती आणि अँण्ड्य्रू फ्लिन्टॉफने मुंबईत केलेल्या कृतीला जशास तसे उत्तर दिले होते.

विराट कोहलीही अशाच आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मुंबईतील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने सलग पाचवी कसोटी मालिका जिंकली. यंदाच्या वर्षात कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने विंडीजविरुद्ध 2-0, न्यूझीलंडविरुद्ध 3-0 आणि इंग्लंडविरुद्ध 3-0 असे यश मिळवले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे.

Web Title: Virat Kohli's aggressive than me - Ganguly