विराट कोहलीचे शतक मोठ्या आघाडीकडे भारताची वाटचाल 

सुनंदन लेले 
Tuesday, 21 August 2018

ट्रेंट ब्रीज : पहिल्या डावात चुकीच्या फटक्‍यामुळे हुकलेले शतक विराट कोहलीने दुसऱ्या डावात पूर्ण केले. विराटला तोलामोलाची साथ देणारा चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्याही शानदारी फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या डावातील आपली स्थिती अधिक भक्कम केली आणि इंग्लंडविरुद्धचा हा तिसरा कसोटी सामना जिंकण्याच्या दिशेने उचलेले ठोस पाऊल अधिक भक्कम केले. 

चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने भारतीय संघाची आघाडी इंग्लंडच्या आवाक्‍याबाहेर करून ठेवायला केलेली टिच्चून फलंदाजी हेच तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या तीन तासांच्या खेळाचे वैशिष्ट्य राहिले. कप्तान ज्यो रूटने सर्व पर्याय वापरून बघूनही चेतेश्वर पुजाराची विकेट सोडता इंग्लंडला यश मिळाले नाही. विराटने शतक पूर्ण केले तेव्हा भारताच्या 3 बाद 280 धावा झाल्या होत्या आणि एकूण आघाडीचा आकडा साडेचारशेचा टप्पा पार करत होता. 

नॉटिंगहॅम कसोटी जिंकण्याकडे ठोस वाटचाल करायच्या पक्‍क्‍या इराद्याने कोहली - पुजारा तिसऱ्या दिवशी ट्रेंट ब्रीज मैदानात उतरले. अँडरसनने एकदम शिस्तबद्ध मारा करून धावांना लगाम घातला. पुजाराला एक जीवदान लाभले जेव्हा जेनिंग्जला कठीण झेल पकडता आला नाही. कोहलीविरुद्ध दोन पायचित असल्याची मागितलेली दाद अपयशी ठरली. 

पहिले दोन तास फलंदाज आणि गोलंदाज संयम तपासत होते. अचूक मारा करत असल्याने कोहली-पुजाराला मोठे फटके मारता येत नव्हते. हाती भरपूर वेळ असल्याने फलंदाज घाई करत नव्हते. त्यातही इंग्लंडला एक मोठा आघात सहन करावा लागला. जेव्हा अँडरसनचा स्टंप मागे स्विंग झालेला चेंडू जॉनी बेअरस्टोच्या डाव्या हाताच्या बोटावर आदळला. कळवळत बेअरस्टोने मैदान सोडले. बटलरच्या रूपाने दुसरा विकेट किपर हजर होता, ज्याचा फायदा इंग्लंडला झाला. 

संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव : 329 आणि दुसरा डाव : 93 षटकांत 3 बाद 279 (धवन 44, केएल राहुल 36, विराट कोहली 106 स्टोक्‍स्‌ 53-2) इंग्लंड पहिला डाव : 161. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli's century is India's way to the big lead