IPL 2019 : पहिल्या दोन आठवड्यासाठी 'असे' असेल वेळापत्रक

वृत्तसंस्था
Tuesday, 19 February 2019

इंडियन प्रिमियर लिगचे पहिल्या दोन आठवड्यासाठीचे वेळापत्रक जाहीर झाले असून विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी सलामीलाच भिडणार आहेत. पहिल्या दोन आठवड्यात 23 मार्चपासून 05 एप्रिलपर्यंत एकूण 17 सामने खेळवले जातील. सध्यातरी हे वेळापत्रक लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापर्यंत कायम असेल. 

नवी दिल्ली- इंडियन प्रिमियर लिगचे पहिल्या दोन आठवड्यासाठीचे वेळापत्रक जाहीर झाले असून विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी सलामीलाच भिडणार आहेत. पहिल्या दोन आठवड्यात 23 मार्चपासून 05 एप्रिलपर्यंत एकूण 17 सामने खेळवले जातील. सध्यातरी हे वेळापत्रक लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापर्यंत कायम असेल. 

लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंततरी यामध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नसून, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही बदल असल्यास ते कळविण्यात येतील असे बीसीसीआय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. मतदानाच्या तारखेनुसार या वेळात्रकामध्ये थोडेफार बदल करण्यात येऊ शकता असेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
 

दरम्यान, पहिल्या दोन आठवड्यात म्हणजे 23 मार्चपासून 05 एप्रिलपर्यांत एकूण 17 सामने खेळवण्यात येणार असून प्रत्येक संघ किमान 4 सामने खेळणार आहे, तर डेक्कन चार्जर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे संघ प्रत्येकी 05 सामने खेळतील. त्याचबरोबर प्रत्येक संघ घरच्या मैदानावर दोन तर बाहेर दोन सामने खेळेल, तर डेक्कन चार्जर्स घरच्या मैदानावर 3 सामने खेळेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू हा संघ पाचपैकी केवळ दोन सामने घरच्या मैदानावर खेळेल.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VIVO IPL 2019 Match Schedule from 23rd March 2019 to 05th April 2019