esakal | ऑस्ट्रेलियात हवेत जादा सराव सामने- शास्त्री ​
sakal

बोलून बातमी शोधा

want More practice matches in Australia says Shastri

परदेशात कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पुरेसे सराव सामने मिळत नसल्याचा परिणाम होत असल्याची उपरती झालेले मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केलेल्या सराव सामन्याच्या मागणीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनुकूलता दर्शविली आहे.

ऑस्ट्रेलियात हवेत जादा सराव सामने- शास्त्री ​

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- परदेशात कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पुरेसे सराव सामने मिळत नसल्याचा परिणाम होत असल्याची उपरती झालेले मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केलेल्या सराव सामन्याच्या मागणीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनुकूलता दर्शविली आहे.

आधी दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात पराभूत झालेल्या भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जादा सराव सामने असावेत, अशी मागणी शास्त्री यांनी मायदेशात परतताच केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतासाठी केवळ एकच सराव सामना होता; परंतु या सामन्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला होता.

शास्त्री यांच्या मागणीला प्रतिसाद देत आम्ही अधिक सराव सामने भारतीयांसाठी आयोजित करण्यास तयार असल्याचे "क्रिकेट ऑस्ट्रेलिया'कडून स्पष्ट करण्यात आले. बीसीसीआयकडून आमच्याकडे अजून अधिकृत मागणी करण्यात आलेली नाही; परंतु अशी मागणी झाल्यास आमचे विचार सकारात्मक असतील, असे त्यांच्या प्रवक्‍त्याने सांगितले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन टी-20, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 21 नोव्हेंबर ते 18 जानेवारी असा या दौऱ्याचा कालावधी आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियात भारतीय संघाचा कस पणास लागणार आहे.

loading image
go to top