रोहित शर्माला ताकीद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई - कोलकता नाइटरायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाविरोधात भर मैदानात त्रागा व्यक्त केल्याबद्दल मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला सामनाधिकाऱ्यांनी ताकीद दिली आहे. पुन्हा अशी चूक झाल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुनील नारायणच्या चेंडूवर रोहित शर्मा पायचीत असल्याचा निर्णय पंच सी. के. नंदन यांनी दिला. हा चेंडू बॅटला लागून पॅडला लागलेला असल्यामुळे रोहित संतापला आणि चेंडू बॅटला लागल्याने त्याने लगेचच पंचांच्या दिशेने बॅट दाखवली आणि पॅव्हेलियनमध्ये परतत असताना पंचांच्या दिशेने त्रागा केला होता. सामना संपल्यानंतर रोहितने आपली चूक मान्य केली आणि सामनाधिकाऱ्यांनी ही पहिलीच चूक असल्याने त्याला ताकीद दिली.

Web Title: warning to rohit sharma