Video : मराठमोळ्या स्मृतीने घेतलेला अफलातून कॅच होताेय व्हायरल

वृत्तसंस्था
Thursday, 9 January 2020

स्मृतीने सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू हवेत उडी मारत एक हाती झेल टिपत देविका वैद्यला माघारी धाडलं…

मुंबई ः भारताची गुणी उपकर्णधार स्मृती मंधाना हिच्यासाठी मागील वर्षाप्रमाणेच आगामी वर्ष देखील लकी ठरण्याचे संकेत दिसत आहेत. तिने घेतलेल्या एका कॅचचा व्हिडीओ सध्या खुपच व्हायरल होतो आहे.

भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू स्मृती मंधाना ही तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाते. मात्र महिलांच्या टी-२० चॅलेंजर ट्रॉफीत भारत ब संघाकडून खेळताना स्मृतीने भल्याभल्या खेळाडूंनाही लाजवेल अशाप्रकारे हवेत उडी मारत एकहाती झेल टिपला.

भारत अ संघ फलंदाजी करताना, अनुजा पाटील सहावं षटक टाकत होती. देविका वैद्यने अनुजाच्या गोलंदाजीवर कव्हरचा फटका खेळला, मात्र स्मृतीने सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू हवेत उडी मारत एक हाती झेल टिपत देविका वैद्यला माघारी धाडलं…पाहा स्मृती मंधानाने घेतलेल्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ

सोशल मीडियावर स्मृती मंधानाच्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. स्मृतीने आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर भारत ब संघाने टी-२० चॅलेंजर ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

कामगिरी : १) वनडेमध्ये ६६.९०च्या सरासरीने धावा, तर टी-२०मध्ये १३०.६७च्या स्ट्राइक रेटने धावांची टांकसाळ... अशी खणखणीत कामगिरी केल्याने स्मृती मंधानाची आयसीसीच्या या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday to the most nautanki person in our team God bless you and may you shine brightly in all that you do

A post shared by Smriti Mandhana (smriti_mandhana) on

२)आयसीसीच्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार स्मृती वनडे रँकिंगमध्ये चौथ्या, तर टी-२० रँकिंगमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.

Related image

३)आयसीसीचा मानाचा पुरस्कार पटकावणारी स्मृती ही भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी तेज गोलंदाज झुलन गोस्वामीने हा पुरस्कार जिंकला आहे.

Image result for smriti mandhana hd images

आयसीसीनेही केले होते कौतुक : मागील वर्षी स्मृतीला 'सर्वोत्तम क्रिकेटपटू' आणि 'वनडेतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू' असे दोन पुरस्कार दिले होते. त्यावेळी आयसीसीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले होते, ''आपल्या सुरेख खेळींनी स्मृतीने क्रिकेट पाठिराख्यांचे मनोरंजन केले आहे. तिच्या खेळींनी महिला क्रिकेटसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch smriti mandhana grabs a one handed stunner to dismiss devika vaidhya