esakal | पुण्यातील सामन्यांवर पाणी संकट!
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील सामन्यांवर पाणी संकट!

पुण्यातील सामन्यांवर पाणी संकट!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - पुण्यात सिंचन विभागामार्फत पवना नदीतून गहुंजे स्टेडियमला होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बुधवारी (ता. १८) मुंबई उच्च न्यायालयाने रोखला. आयपीएलच्या सामन्यांसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाणीपुरवठा करू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांनी होणाऱ्या सामन्यांवर पाणीसंकटाची शक्‍यता आहे. 

लोकसत्ता मूव्हमेंट या सामाजिक संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी स्टेडियमना पाणीपुरवठा केला जातो, अशी तक्रार याचिकादारांनी केली आहे. तमिळनाडूत निर्माण झालेल्या कावेरी वादामुळे तेथील सामने पुण्यात होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर, या सामन्यांसाठी पाण्याचा पुरवठा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कशाप्रकारे करणार आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. असोसिएशनच्या वतीने याबाबत खुलासा करण्यात आला. रेनवॉटर हार्वेस्टिंगमार्फत सध्या सुमारे ३२ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असोसिएशनकडे आहे. तसेच पवना नदीतूनही पाणीपुरवठा करण्याचा करार राज्य सरकारसोबत करण्यात आला आहे. सुमारे अडीच लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या कराराचा तपशील बुधवारी न्यायालयात दाखल करण्यात आला. 

loading image