वनडेतून करणार टी-20 वर्ल्डकपची तयारी : रवी शास्त्री

वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडमध्ये पोहोचला आहे. 
भारतीय संघाला सध्या फक्त टी-20 विश्वकरंडक जिंकण्याच्या विचाराने व्यापले असल्याचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सांगितले. तसेच आता होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतूनही भारतीय संघ टी20 विश्वकरंडकाचीच तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

ऑकलंड : भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघाला सध्या फक्त टी-20 विश्वकरंडक जिंकण्याच्या विचाराने व्यापले असल्याचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सांगितले. तसेच आता होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतूनही भारतीय संघ टी20 विश्वकरंडकाचीच तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते म्हणाले, ''यावर्षी होणाऱ्या प्रत्येत एकदिवसीय सामन्यातून आम्ही टी-20 विश्वकरंडकाची तयारी करणार आहोत. समोर कोणताही प्रतिस्पर्धी असला तरी कोणत्याही देशात आम्ही त्याच ईर्षेने खेळणार आहोत आणि हेच आमचे ध्येय आहे. टी-20 विश्वकरंडकाने संघातील प्रत्येकाचे मन व्यापले आहे आणि हे लक्ष्य आम्ही गाठणारच.''

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

संघातील प्रत्येक खेळाडू इतरांच्या चांगल्या कामगिरीबद्दल आनंद साजरा करतो आणि हेच संघाच्या यशाचे गमक असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "आमच्या शब्दकोशात मी हा शब्दच नाही. संघ नेहमी आम्ही म्हणूनच विचार करतो. कोणताही सामना संघाने जिंकलेला असतो म्हणून संघ नेहमी एकमेकांच्या आनंदात आनंद मानतो.''

चाळीस रुपये डझन; काम मात्र लाखमोलाचे

भारतीय संघ खूपच चांगल्या मनस्थितीत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ''पहिला सामना मोठ्या फरकाने गमावल्यावर एकाही खेळाडू खचला नाही की आत्मविश्वास गमावला नाही. सगळ्यांनी बसून विचार केला आणि बेधडक खेळ करायचा मनोदय पक्का केला. दुसर्‍या सामन्यात विजय मिळवून 1-1 बरोबरी साधल्यावर बंगळूरला ज्या प्रकारे आपण चांगल्या धावसंख्येचा दमदार फलंदाजी करून पाठलाग केला ते बघता मालिकेतील विजय अजून गोड झाला. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्ण ताकदीच्या ऑस्ट्रेलियन संघाला आपण हरवले त्याचे समाधान मोठे आहे.''

पर्याय आवडतात
लोकेश राहुलच्या रुपात भारतीय संघाकडे यष्टीरक्षणासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''आम्हाला पर्याय आवडतात. मात्र, धवनसाख्या मॅच विनरला दुखापत झाल्याचे फार वाईट वाटते. 

न्यूझीलंडमध्ये केदार खेळणार 
गेले अनेक दिवस केदार जाधव संघातून बाहेर आहे. त्याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, ''केदार एकदिवसीय संघाचा महत्वाचा भाग आहे आणि तो न्यूझीलंडमध्ये नक्कीच खेळेल. संघातील इतर खेळाडूंप्रमाणेच त्यालाही महत्व दिले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We love options says Ravi Shastri