भारताच्या पराभवानंतरही सचिनकडून धोनीचे कौतुक

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भारताला काल पराभव स्वीकारावा लागला आहे. तरीसुद्धा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. महेंद्रसिंग धोनी हा कालच्या सामन्यात 10000 धावा करणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करताना सचिनने धोनीविषयी वेल डन, माय फ्रेंड असे गौरवोद्गार काढले आहेत.

मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भारताला काल पराभव स्वीकारावा लागला आहे. तरीसुद्धा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. महेंद्रसिंग धोनी हा कालच्या सामन्यात 10000 धावा करणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करताना सचिनने धोनीविषयी वेल डन, माय फ्रेंड असे गौरवोद्गार काढले आहेत.

सचिनने, ट्विट करुन म्हटले आहे की, ही एक खुप मोठी कामगिरी आहे. 10000 धावांचा पल्ला पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन ! वेल डन माय फ्रेंड अशा आशयाचे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे. त्याचबरोबर, कुमार संगकारा, विरेंद्र सेहवाग, विनोद कांबळी यांनीही धोनीला ट्विट करुन 10000 धावा पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, कालच्या भारत-इंग्लंड सामन्यात महेंद्रसिंग धोनीने 10000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याने हा टप्पा 320 सामन्यांमध्ये 51.40 च्या सरासरीने पूर्ण केला आहे. भारतातर्फे एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावा कराणारा धोनी हा आता सचिन, गांगुली आणि राहुल द्रविडनंतर चौथा खेळाडू बनला आहे. आतापर्यंत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनीच दहा हजार धावा करण्याची किमया साधलेली आहे. परंतु, धोनी सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने या सामन्यात यष्टीमागे 300 वा झेल जगातील चौथा यष्टीरक्षक होण्याचीही कामगिरी केली आहे.

Web Title: Well Done My Friend Says Tendulkar as Dhoni Reaches 10000 ODI Runs