पाकिस्तानची विंडीजवर मात 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

संक्षिप्त धावफलक 
वेस्ट इंडीज - 286 व 152 (किएरॅन पॉवेल 49, यासीर शाह 6-63) पराभूत विरुद्ध पाकिस्तान - 407 व 36/3 (युनूस खान 6, मिस्बा नाबाद 12) 

किंग्जस्टन (जमैका) - पाकिस्तानने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजला सात विकेट राखून हरविले. याबरोबरच पाकने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

यासीर शाहने सहा विकेट घेतल्यामुळे पाकने विंडीजला 152 धावांत गुंडाळले. 32 धावांचे आव्हान गाठण्यापूर्वी पाकने तीन विकेट गमावल्या. कर्णधार मिस्बा उल हक याने देवेंद्र बिशू याला लागोपाठ दोन षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकने सलग सहा कसोटींमधील अपयशी मालिका अखेर खंडित केली. 

121 धावांच्या पिछाडीनंतर विंडीजची 4 बाद 93 अशी घसरगुंडी उडाली होती. यासीरचा लेगस्पीन मारा विंडीजसाठी डोकेदुखी ठरला. "सामनावीर' पुरस्कार त्यालाच मिळाला. तो म्हणाला, की मागील मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मला झगडावे लागले. खेळपट्‌टीच्या खराब झालेल्या भागांमुळे मला फायदा झाला.' 

संक्षिप्त धावफलक 
वेस्ट इंडीज - 286 व 152 (किएरॅन पॉवेल 49, यासीर शाह 6-63) पराभूत विरुद्ध पाकिस्तान - 407 व 36/3 (युनूस खान 6, मिस्बा नाबाद 12) 

Web Title: West Indies vs Pakistan, 1st Test, Kingston