चारशेवर धावांचे आव्हान कोणी कोणी पेललेय?

टीम ई सकाळ
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

चौथ्या डावात सर्वसाधारपणे भारतीय खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना साथ देतात. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकिफचा सामना करताना पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची घाबरगुंडी उडाली होती. त्यामुळे, दुसऱया डावात भारतीय फलंदाज ओकिफला कसे सामोरे जातात यावर सारे काही अवलंबून आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला पुण्यामध्ये येत्या दीड दिवसात इतिहास घडविण्याची संधी आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आधी कोणत्याही संघाने चौथ्या डावात 441 धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळविलेला नाही. कोहलीच्या संघाने हा पराक्रम केल्यास, 2003 पासूनचा वेस्ट इंडिजच्या संघाचा 418 धावांच्या पाठलागाचा विक्रम मोडला जाऊ शकतो.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावरील खेळपट्टी पाहता विक्रमाची अपेक्षा धुसर आहे. मात्र, कोहलीच्या संघाची जिद्द आणि अखेरच्या क्षणी मुसंडी मारण्याची क्षमता लक्षात घेता, हा पराक्रम अशक्य नाही.

चौथ्या डावात सर्वसाधारपणे भारतीय खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना साथ देतात. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकिफचा सामना करताना पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची घाबरगुंडी उडाली होती. त्यामुळे, दुसऱया डावात भारतीय फलंदाज ओकिफला कसे सामोरे जातात यावर सारे काही अवलंबून आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वोच्च धावा करून मिळविलेले विजय असेः
संघ टार्गेट विरुद्ध स्थळ वर्ष
वेस्ट इंडिज 418/7 ऑस्ट्रेलिया अँटिग्वा मे 2003
दक्षिण आफ्रिका 414/4 ऑस्ट्रेलिया पर्थ डिसेंबर 2008
भारत 406/4 वेस्ट इंडिज त्रिनिदाद एप्रिल 1976

Web Title: Who won scoring four hundred runs in test cricket