फिट राहिलो तर आणखी 10 वर्षे खेळेन : विराट

वृत्तसंस्था
Sunday, 10 September 2017

विराट कोहली फाउंडेशन
क्रिकेटमध्ये घवघवीत यश मिळवत असलेला विराट आता इतर खेळातील खास करून ग्रासरुट खेळाडूंच्या मदतीसाठी आपली तिजोरी उघडणार आहे. संजीव गोयंका ग्रुपच्या साथीने त्याने "विराट कोहली फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. उदयोन्मख आणि होतकरू खेळांसाठी प्रत्येक वर्षासाठी कमीत कमी 2 कोटी रुपयांची स्कॉलरशिप या फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे. खेळाडूंपासून खेळांशी निगडित असलेल्या तज्ज्ञांची निवड समिती तयार करण्यात येणार असून, ही समिती स्कॉलरशिप प्राप्त खेळाडू निवडणार आहेत.

नवी दिल्ली : काही दिवसांत 29 वर्षांचा होणारा विराट कोहली भविष्याबाबत बोलत आहे. आणखी 10 वर्षे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचेय; पण त्यासाठी आत्ता तंदुरुस्त राहणे आवश्‍यक आहे, असे त्याचे म्हणणे आहे.

आपण किती पुढे खेळू शकतो, हे खरं तर बहुतेकांना उमजत नसते. कधी थांबायचे याचा अंदाज नसल्यामुळे सद्यःस्थितीत क्षमतेच्या 70 टक्के खेळ उंचावत असतो. त्यामुळे निवृत्तीची वेळ येईपर्यंत स्वतःला प्रोत्साहित करणे आवश्‍यक असते. उदाहरण द्यायचे तर तंदुरुस्तीसाठी मी आत्ता जी मेहनत घेत आहे तिच कायम ठेवली, तर आणखी 10 वर्षे खेळेन, असे विराटने एका व्यावसायिक कार्यक्रमात सांगितले.
तिन्ही प्रकारात तेढवच्या तडफेने आणि आक्रमकपणे खेळणारा भारतीय कर्णधार एकेक विक्रम पादाक्रांत करत आहे. आत्तापर्यंत 60 कसोटी सामन्यांत त्याने 4658 आणि 194 एकदिवसीय सामन्यांत 8587 धावा केलेल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या विक्रमात आता सचिन तेंडुलकरच त्याच्या पुढे आहे.

विराट कोहली फाउंडेशन
क्रिकेटमध्ये घवघवीत यश मिळवत असलेला विराट आता इतर खेळातील खास करून ग्रासरुट खेळाडूंच्या मदतीसाठी आपली तिजोरी उघडणार आहे. संजीव गोयंका ग्रुपच्या साथीने त्याने "विराट कोहली फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. उदयोन्मख आणि होतकरू खेळांसाठी प्रत्येक वर्षासाठी कमीत कमी 2 कोटी रुपयांची स्कॉलरशिप या फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे. खेळाडूंपासून खेळांशी निगडित असलेल्या तज्ज्ञांची निवड समिती तयार करण्यात येणार असून, ही समिती स्कॉलरशिप प्राप्त खेळाडू निवडणार आहेत.

गोपीचंदचे कौतुक
या कार्यक्रमात माजी बॅडमिंटन स्टार आणि ऑलिंपिकपदक विजेत्यांचे प्रशिक्षक गोपीचंद उपस्थित होते. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत गोपीचंद यांनी मिळवलेले विजेतेपद आपल्याला कसे प्रोत्साहित करणारे होते, याची आठवण विराटने काढली. गोपी यांचा विजेतेपदाचा अंतिम सामना मी माझ्या मित्रांसोबत टीव्हीवर पाहिला होता. यातील एक मित्र राज्य स्तरावरील बॅडमिंटनपटू आहे. गोपीसर यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी किदांबी श्रीकांतसारखे विश्‍वविख्यात आणि पी. व्ही. सिंधू, साईना नेहवालसारख्या ऑलिंपिकपदक विजेत्या खेळाडू तयार केल्या आहेत, असे विराटने सांगितले.

क्रीडा क्षेत्रात आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे. एकाच खेळाला प्राधान्य असलेला देश अशी आपली ओळख पुसली गेली आहे. जे छोटे खेळाडू आपापल्या खेळात कमालीची प्रगती करू शकतील. देशांची शान उंचावण्याची गुणवत्ता असलेल्या अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार केली आहे.
- विराट कोहली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will play for another 10 years if I remain fit: Virat Kohli