भारतीय महिलांचा पाकवर विजय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 November 2018

प्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. सलग दुसऱ्या विजयाने त्यांनी ‘ब’ गटातून गुण तक्‍त्यात आघाडी घेतली आहे. 

प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांच्या क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे पाकिस्तानला ७ बाद १३३ धावांची मजल मारता आली होती. त्यानंतर भारतीय महिलांनी १९ षटकांत ३ बाद १३७ धावा केल्या. मितालीची ५६ धावांची खेळी निर्णायक ठरली.

आव्हानाचा पाठलाग करताना डाव सुरू होण्यापूर्वीच भारताच्या नावावर दहा धावा लागल्या होत्या. बिनबाद दहा धावसंख्येवरूनच भारताने विजयाचा पाठलाग सुरू केला. पाकिस्तानी फलंदाज धाव काढताना खेळपट्टीवरील धोकादायक जागेवर धावत असल्यामुळे पंचांनी पाकिस्तानला दहा धावांचा दंड केला. या दहा धावा त्यांच्या धावांतून न वगळता भारताच्या नावावर वळविण्यात आल्या. मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी ५७ चेंडूंतच ७३ धावांची सलामी दिली. या वेळी भारताने ठरावीक अंतराने स्मृती (२६), जेमिमा रॉड्रिग्ज (१६) आणि मिताली (५६) यांच्या विकेट गमावल्या. पण, त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने वेदा कृष्णमूर्तीच्या साथीत विजय साकार केला.

त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना बिसमाह माहरुफ आणि निदा दार यांनी चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची चिवट भागीदारी केली, पण त्याला भारताचे खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरले. भारताच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे आत्मविश्‍वास उंचावलेल्या बिसमाह आणि निदा यांनी षटकामागे आठपेक्षा जास्त गतीने आक्रमक भागीदारी करीत भारताची डोकेदुखी वाढवली. बिस्मा मारुफ (५३) आणि निदा दर (५२) यांच्या अर्धशतकी खेळीचाच पाकिस्तानला काय तो दिलासा मिळाला. भारताकडून पुन्हा एकदा हेमलता आणि पूनम यादव यांची फिरकी प्रभावी ठरली. दोघींनी प्रत्येकी २ गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक -
पाकिस्तान २० षटकांत ७ बाद १३३ (बिस्मा महारुफ ५३, निदा दर ५२, हेमलता २-३४, पूनम यादव २-२२) पराभूत वि. भारत १९ षटकांत ३ बाद १७३ (मिताली राज ५६, स्मृती मानधना २६, हरमनप्रीत कौर नाबाद १४)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Cricket World Cup T-20 Win India