भारतीय महिलांचा मलेशियावर मोठा विजय 

वृत्तसंस्था
Monday, 4 June 2018

संक्षिप्त धावफलक ः भारत ः 20 षटकांत 3 बाद 169 (मिताली राज 97 -69 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार, हरमनप्रीत कौर 32 -23 चेंडू, 4 चौकार, अमिना हसिम 1-30) वि. वि. मलेशिया ः 13.4 षटकांत सर्व बाद 27 (साहा अझमी 9, पूजा वस्त्रकार 3-6, अनुजा पाटील 2-9, पूनम यादव 2-0). 

क्‍वालालंपूर - सलग सात वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या भारताने यंदाच्या आशिया करंडक महिला स्पर्धेत सलामीला मलेशियाचा 142 धावांनी धुव्वा उडवला. मिताली राजची शानदार 97 धावांची खेळी आणि त्यानंतर वस्त्रकार, अनुजा आणि पूनम यांची भेदक गोलंदाजी मलेशियाच्या फलंदाजीची दाणादाण उडवणारी ठरली. 

प्रथम फलंदाजी करताना भरताने 20 षटकांत 3 बाद 169 धावा केल्या, त्यानंतर मलेशियाला 13.4 षटकांत 27 धावांतच गुंडाळले. वस्त्रकारने तीन, अनुजा पाटीलने दोन विकेट मिळवले. पूनम यादवनेही दोन विकेट मिळवताना एकही धाव दिली नाही. मलेशियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. साहा अझमीने केलेली नऊ ही धावसंख्या त्यांच्याकडून सर्वाधिक ठरली. सहा जणी भोपळाही फोडू शकल्या नाहीत. 

तत्पूर्वी, भारताची सुरुवात चांगली नव्हती. 3 बाद 35 नंतर मिताली राजने 69 चेंडूंत नाबाद 97 धावांची खेळी केली. तिने 13 चौकार आणि एक षटकार मारला. 

संक्षिप्त धावफलक ः भारत ः 20 षटकांत 3 बाद 169 (मिताली राज 97 -69 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार, हरमनप्रीत कौर 32 -23 चेंडू, 4 चौकार, अमिना हसिम 1-30) वि. वि. मलेशिया ः 13.4 षटकांत सर्व बाद 27 (साहा अझमी 9, पूजा वस्त्रकार 3-6, अनुजा पाटील 2-9, पूनम यादव 2-0). 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women’s Asia Cup T20: Mithali Raj, bowlers guide India to crushing win over Malaysia