World Cup 2019 : 'या' सामन्यापासून अनुष्का असेल विराटसोबत

वृत्तसंस्था
Wednesday, 19 June 2019

भारतीय संघाला चीअर अप करण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा लंडनमध्ये दाखल झाली आहे.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : साखळी सामन्यात मिळविलेल्या लागोपाठ विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ सध्या छोट्या सुट्टीचा आनंद घेत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर पुढील सामन्यासाठी अजून पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. भारतीय संघाचा पुढील सामना 22 जूनला अफगाणिस्तानशी होणार आहे.

या सामन्यात भारतीय संघाला चीअर अप करण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा लंडनमध्ये दाखल झाली आहे. अनुष्का नुकतीच विराट कोहलीसह लंडनमध्ये आढळली. हॉटेलमधून बाहेर पडतानाचा हा फोटो कोहलीच्या एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अनुष्का नव्या हेअरकटमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काचा हा फोटो व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@virat.kohli and @anushkasharma on the old bond street in London today! I love Anushka's new haircut A post shared by BleedKohlism2.0(@bleedingkohlism) on

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, विश्व करंडक स्पर्धा सुरू झाल्याच्या 20 दिवसांनंतर खेळाडूंना त्यांच्या पत्नींना बोलवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या पत्नी आणि अपत्ये काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये दाखल झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 Anushka will be with Virat from this match