World cup 2019: नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा फलंदाजी करण्याचा निर्णय

वृत्तसंस्था
Wednesday, 5 June 2019

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केदार जाधव पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाने गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर सोपविली आहे.  

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्पटन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघाने विश्वकरंडकाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचा हा पहिला सामना आहे, तर आफ्रिका स्पर्धेतील तिसरा सामना खेळत आहे. 

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केदार जाधव पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाने गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर सोपविली आहे.  

दुसरीकडे आफ्रिकेचा संघ दुखापतींनी हैराण आहे. मात्र, सलामीवीर हाशिम आमला तंदुरुस्त झाल्याने तो फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World cup 2019 SA to Bat frist vs IND Jadhav and Bhuvi Included