पाकिस्तानचा 'असा' बदला घ्याः तेंडुलकर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 February 2019

मुंबईः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये संतापाची भावना आहे. अनेकजण संतापाच्या भावना विविध पद्धतीने व्यक्त करत आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटू लागला आहे. मात्र, सामना रद्द करून पाकिस्तानला फुकटचे 2 गुण का द्यायचे? असा सवाल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उपस्थित केला आहे. पाकिस्तानला पराभूत करून हल्ल्याचा बदला घ्या, असेही सचिन म्हणाला.

विश्वकरंडक 2019 स्पर्धा 30 मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत 16 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटू लागला आहे. पण, सामना रद्द करून पाकिस्तानला फुकटचे 2 गुण का द्यायचे? भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखायला हवे. त्यामुळे विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत करावे आणि आपली ऐतिहासिक विजयी घोडदौड सुरूच ठेवावी, असे मत सचिनने व्यक्त केले आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सचिनने ट्विटरवून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. दरम्यान, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील राज्य क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो आपल्या स्टेडियममधून आणि मुख्यालयात हटवले. काही क्रिकेट जाणकारांनी आणि क्रिकेटपटूंनी आपला राग व्यक्त करताना सामना रद्द करण्याची मागणी केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world cup 2019 sachin tendulkar says beat pakistan and take revenge of pulwama terror attack