World Cup 2019 : बांगलादेशचे ‘वाजले की बारा’ म्हणत सोनालीने लुटला आनंद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 July 2019

क्रिकेटची खरी शौकीन असल्याने सोनाली लंडनहून ट्रेन पकडून एकटी सामना बघायला एजबस्टन मैदानावर आली. ‘टीव्हीवर काहीच मजा येत नाही... खरी मजा मैदानावर येऊन सामना बघण्याची आहे... मी खूप आनंद घेतला आजच्या सामन्याचा. रोहितचे बहारदार शतक कायम स्मरणात राहील माझ्या,’ असे सोनाली म्हणाली.

बर्मिंगहॅम - बांगलादेश संघाचे ‘वाजले की बारा’ गाणे म्हणत सोनाली कुलकर्णीने एजबस्टन मैदानावर सामन्याचा आनंद घेतला. ८ जुलैपासून नव्या सिनेमाचे शूटिंग लंडनला होणार असल्याने सोनाली इंग्लंडला आली आहे.

क्रिकेटची खरी शौकीन असल्याने सोनाली लंडनहून ट्रेन पकडून एकटी सामना बघायला एजबस्टन मैदानावर आली. ‘टीव्हीवर काहीच मजा येत नाही... खरी मजा मैदानावर येऊन सामना बघण्याची आहे... मी खूप आनंद घेतला आजच्या सामन्याचा. रोहितचे बहारदार शतक कायम स्मरणात राहील माझ्या,’ असे सोनाली म्हणाली.

रोहित शर्माने स्पर्धेतील चौथे शतक झळकावून भारताला बांगलादेश विरुद्ध 28 धावांचा विजय मिळवायला सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माने (104 धावा) लोकेश राहुलसह सलामीला रचलेली 180 धावांची जबरदस्त भागीदारी मोठ्या धावसंख्येचा पाया ठरली. मुस्तफीजूरने 5 फलंदाजांना बाद केले तरी भारताला 314 धावा उभारता आल्या. इनफॉर्म फलंदाज शकीब अल हसनच्या 66 धावा आणि तळातील फलंदाजांनी जोरकस प्रयत्न केल्याने बांगलादेशाची मजल 286 पर्यंत गेली. हार्दिक पंड्या आणि बुमराने मिळून 7 फलंदाजांना बाद करून बांगलादेशचा डाव संपवला. विजयासह 13 गुणांनी भारताने उपांत्य फेरीतील स्थान 100% पक्के केले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 Sonali Kulkarni attend India bangladesh Cricket match