World Cup 2019 : सट्टेबाज सांगतायत 'हाच' संघ जिंकणार वर्ल्डकप

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

सट्टेबाजी कंपन्यांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीवरही जोरदार सट्टा लावला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. या सामन्यात भारत न्यूझीलंडवर मात करेल, असे या सट्टेबाजी कंपन्यांना वाटत आहे.

वर्ल्ड कप 2019 :
लंडन :
वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे सामने बाकी असतानाच सट्टेबाजांनी तर हा विश्वचषक कोण जिंकणार, हे जाहीरदेखील करून टाकले आहे. लैडब्रोक्स और बेटवे या दोन्ही ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्स आहेत.

सट्टेबाजी कंपन्यांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीवरही जोरदार सट्टा लावला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. या सामन्यात भारत न्यूझीलंडवर मात करेल, असे या सट्टेबाजी कंपन्यांना वाटत आहे.

लैडब्रोक्सने भारताच्या विजयावर 13/8 असा भाव दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (15/8), ऑस्ट्रेलिया (11/4) आणि न्यूझीलंडला (8/1) असे भाव दिले आहेत. या सट्टेबाजींने दिलेल्या भावानुसार भारतीय संघ हा विश्वचषकाचा संभाव्य विजेता समजला जात आहे. बेटवे या सट्टेबाजी कंपनीने भारताला 2.8 असा भाव दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (3), ऑस्ट्रेलिया (3.8) आणि न्यूझीलंडला (9.5) असे भाव दिले आहेत. बेटवे या कंपनीनुसारही भारतीय संघ विश्वचषक जिंकेल, असे म्हटले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The World Cup to be won by the 'this' team said bookies