यासिर शाहने घेतली पुन्हा विंडीजची फिरकी

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

अबुधाबी : लेग स्पिनर यासिर शाहने सहा गडी बाद करत पाकिस्तानला मंगळवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध 133 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयाने पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असे विजयाधिक्‍य मिळविले.

सामन्याच्या अखेरच्या दिवशी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव 322 धावांत संपुष्टात आला. यासिर शाहने 124 धावांत सहा गडी बाद केले. त्याने दुसऱ्यांदा सामन्यात दहा गडी बाद करण्याची कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने चार गडी बाद केले होते.

वेस्ट इंडीजसमोर 456 धावांचे कठीण आव्हान होते. मधल्या फळीत जेम्स ब्लॅकवूडने 95 धावांची खेळी केली; पण नंतर त्याचे साथीदार अपयशी ठरले. तरी देखील त्यांनी 108 षटके जग धरला होता. शई होप याने जिगरबाज खेळीचे प्रदर्शन करताना 41 धावा केल्या होप आणि देवेंद्र बिशू यांनी आठव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकी गोलंदाज झुल्फिकार बाबर याने या दोघांना बाद करून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पाकिस्तानने पहिल्या कसोटीत 56 धावांनी विजय मिळविला होता. त्या वेळी डॅरेन ब्राव्होची खेळी झुंजार ठरली. या वेळी क्रेग ब्रेथवेटच्या सलामीनंतर ब्लॅकवूड एकाकी लढला. त्याने 127 चेंडूंचा सामना करताना 11 चौकारांसह 95 धावा केल्या. कारकिर्दीतील दुसऱ्या शतकापासून तो वंचित राहिला. पाकिस्तानने विंडीजच्या दुसऱ्या डावात 5 बाद 223 धावसंख्येवर दुसरा नवा चेंडू घेतला होता. मात्र, त्यांच्या वेगवान गोलंदाजांना अपयश आले. विंडीजला गुंडाळण्यासाठी त्यांना यासिरच्या फिरकीचीच साथ घ्यावी लागली.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 452 आणि 2 बाद 227 घोषित वि.वि. वेस्ट इंडीज 224 आणि 322 (जेम्स ब्लॅकवूड 95, क्रेग ब्रेथवेट 67, देवेंद्र बिशू 41, यासिर शाह 6-124, झुल्फिकार बाबर 2-51).

Web Title: Yasir Shaha stars once again in Pakistan's win over West Indies