यो यो चाचणी आता सक्तीची : रवी शास्त्री

वृत्तसंस्था
Saturday, 23 June 2018

विराट कोहली भारतीय संघाच्या कर्णधारपदी आल्यापासून संघात स्थान मिळवण्यासाठी यो यो चाचणी पार करणे आवश्यक आहे. या निर्णयावर अनेक मतभेद सुरु असतानाच अंबाती रायुडू, महंमद शमी आणि संजू सॅमसन यो यो चाचणीत नापास झाल्याने त्यांना आर्यलंड- इंग्लंड मालिकेला मुकावे लागणार असल्याचे समोर आले. 

नवी दिल्ली : विराट कोहली भारतीय संघाच्या कर्णधारपदी आल्यापासून संघात स्थान मिळवण्यासाठी यो यो चाचणी पार करणे आवश्यक आहे. या निर्णयावर अनेक मतभेद सुरु असतानाच अंबाती रायुडू, महंमद शमी आणि संजू सॅमसन यो यो चाचणीत नापास झाल्याने त्यांना आर्यलंड- इंग्लंड मालिकेला मुकावे लागणार असल्याचे समोर आले. 

भारतीय संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री आणि विराट कोहलीने मात्र यो यो चाचणीचे समर्थन केले आहे. आर्यलंड- इंग्लंड मालिकेला जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी विचारले असताना रवी शास्त्री म्हणाले, '' क्षमता आणि तंदुरुस्ती यांचे संयोजन अत्यंत महत्वाचे असते, शरीर तंदुरुस्त असल्याशिवाय पूर्ण क्षमतेने खेळ करता येत नाही. यो यो चाचणी सुरु करताना या गोष्टीवरच जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जे या चाचणीला विरोध करत आहेत ते चुकीचे आहेत. यो यो चाचणीचे समीकरण फार सोपे आहे. जर एखादा खेळाडू चाचणीत पास झाला तर तो संघासह खेळेल, नाहीतर खेळणार नाही. कर्णधार, निवड समिती आणि व्यवस्थापनाने या निर्णयाला पाठिंबा दिला असून खेळाडूंचीसुद्धा याला पसंती आहे''.यो यो चाचणी ही आता कायमस्वरुपी असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जेव्हा जसप्रित बुमराह सारखा जलदगती गोलंदाज कसोटी सामन्यातील शेवटचा चेंडूसुद्धा 144 प्रति किमी च्या वेगाने टाकतो तेव्हा तो खरा तंदुरुस्त असल्याचे समजते. अशा बारिकसारीक गोष्टी लोकांच्या नजरेस येत नाहीत मात्र याने फार फरक पडतो. हे उदाहरण देत कोहलीनेही यो यो चाचणीचे समर्थन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yo Yo fitness test is here to stay says Ravi Shastri