युवा क्रिकेटपटू ‘बीसीसीआय’च्या रडारवर

पीटीआय
Wednesday, 18 April 2018

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील क्रिकेटपटूंसाठी करारपद्धती निश्‍चित केली असली तरी आता ते एक पाऊल पुढे जाऊन सध्या ‘आयपीएल’मध्ये खेळत असलेल्या युवा क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर नजर ठेवून आहेत. यासाठी त्यांनी २३ खेळाडू निश्‍चित केले आहेत. 

जे क्रिकेटपटू करारबद्ध नाहीत अशाच क्रिकेटपटूंचा यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पृथ्वी शॉ, शिवम मावी या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंपासून गेल्या मोसमात देशांतर्गत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या मयांक अगरवाल अशा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

राष्ट्रीय किंवा अ संघासाठी दुसरी फळी तयार करण्यासाठी ‘बीसीसीआय’ ही योजना राबवत असून, त्यांनी यासाठी तीन स्तर निश्‍चित केले आहेत. यामध्ये १९ वर्षांखालील, १९ वर्षांपुढील आणि सध्या ‘अ’ संघातून खेळणारे खेळाडू अशा तीन स्तरांचा समावेश आहे. आयपीएलचा व्यग्र कार्यक्रम आणि सामन्यासाठी सातत्याने करावा लागणारा प्रवास यामुळे या खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचा कस लागू शकतो. अशा व्यग्र कार्यक्रमाशी ते कसे जुळवून घेतात हे पाहण्यासाठीच ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी ‘आयपीएल’मध्येच त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. 

या खेळाडूंवर अधिक ताण पडू नये, याचीदेखील ‘बीसीसीआय’ काळजी घेत आहे. या सर्व युवा खेळाडूंसाठी प्रशिक्षण कार्यक्रमदेखील ‘बीसीसीआय’च्या राष्ट्रीय अकादमीतून तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार त्यांच्याकडून सराव करून घेण्याचे आयपीएल फ्रॅंचाइजींवर बंधनकारक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young cricketer BCCI radar