esakal | युसूफच्या दोषीपणाचा भारतीय क्रिकेटला डाग 
sakal

बोलून बातमी शोधा

Yusuf's blasphemy against Indian cricket

युसूफच्या दोषीपणाचा भारतीय क्रिकेटला डाग 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या स्वच्छतेला युसूफ पठाण दोषी ठरण्याचा काळा डाग लागला आहे. उत्तेजक सेवन चाचणीत गेल्यावर्षी भारतीय क्रिकेटमधून केवळ युसूफ पठाण हाच एकमेव खेळाडू दोषी आढळल्याचा अहवाल जागतिक उत्तेजक विरोध समिती (वाडा)ने दिला आहे. 

'वाडा'ने दिलेल्या अहवालानुसार गेल्यावर्षी भारतीय क्रिकेट मंडळाकडून 275 खेळाडूंचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. यामध्ये केवळ युसूफ पठाण एकटाच दोषी आढळला. दोषी आढळल्यानंतर 'बीसीसीआय'ने युसूफला पाच महिन्यांसाठी निलंबित केले होते. 
'वाडा'च्या चाचणीत दोन क्रिकेटपटू दोषी आढळले होते. मात्र, यातील दुसरा क्रिकेटपटू कोण हे निष्पन्न झाले नाही. "बीसीसीआय'कडून घेण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी 233 नमुने कुठल्या ना कुठल्या स्पर्धे दरम्यान, तर अन्य 42 नमुने स्पर्धेव्यतिरक्त घेण्यात आले होते. या वर्षी पंजाबचा अभिषेक गुप्ता उत्तेजक चाचणीत दोषी आढळला असून, त्याला निलंबित करण्यात आले आहे. 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट उत्तेजक मुक्त राहिले असेही 'वाडा'ने स्पष्ट केले आहे. 'आयसीसी'कडून 389 नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले होते. मात्र, यावर्षीच्या सुरवातीलाच अफगाणिस्तानचा महंमद शहजाद उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. 

loading image