esakal | युवराज पुन्हा उतरणार मैदानात; टी-20 खेळणार
sakal

बोलून बातमी शोधा

युवराज पुन्हा उतरणार मैदानात; टी-20 खेळणार

युवराज पुन्हा उतरणार मैदानात; टी-20 खेळणार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

टोरॅंटो ः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंग उद्या पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. कॅनडात होणाऱ्या ग्लोबल टी-20 क्रिकेट स्पर्धेत तो खेळणार आहे. 

टोरॅंटो नॅशनल्स आणि व्हॅंकुअर नाईटस या संघांदरम्यान पहिला सामना होणार असून, युवराज टोरॅंटो संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. विशेष म्हणजे व्हॅंकुअर संघाकडून ख्रिस गेल मैदानात उतरणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये षटकारांचे बादशाह मानले जाणारे हे दोन फलंदाज उद्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील. युवराजला त्याच्या संगातून ब्रेंडन मॅकलम, किएरॉन पोलार्ड, मिशेल मॅक्‍लेनगन हे स्टार क्रिकेटपटू खेळणार आहेत. 

गेलला शोएब मलिक, आंद्रे रसेल, टिम साऊदी, व्हॅन डर डुसेन यांची साथ मिळेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना उद्या रात्री 10 वाजता सुरु होईल. युवराज यावर्षीच्या "आयपीएल'मध्ये खेळला होता. पण, त्याला फारशी संधी मिळाली नव्हती. आता मात्र युवराज नव्याने या लीगमधून आपली बॅट परजणार आहे.

loading image