झिंबाब्वे क्रिकेटपटू बंडाच्या पवित्र्यात 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

मानधन मिळत नसल्यामुळे झिंबाब्वे क्रिकेटपटूंनी 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.

हरारे - मानधन मिळत नसल्यामुळे झिंबाब्वे क्रिकेटपटूंनी 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.

झिंबाब्वे क्रिकेट मंडळाने 25 जूनपर्यंत क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफचे मानधन द्यावे अन्यथा आम्ही तिरंगी टी-20 मालिकेत खेळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

झिंबाब्वे क्रिकेटपटूंना गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेची मॅच फी आणि गेल्या तीन महिन्याचे मानधन मिळालेले नाही. झिंबाब्वे क्रिकेट मंडळाने एका आठवड्यात या वादावर तोडगा काढू, असे सांगितले आहे. 

Web Title: Zimbabwe cricket crisis